कर्नाटकला महाराष्ट्राचे प्रत्यूत्तर; गाव तर सोडाच बेळगाव, निपाणी, कारवारही घेऊ

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या ४० गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये घ्या, असा ठराव २०१२ मध्ये केला होता. पाणीप्रश्नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगली जिल्ह्यातल्या गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा बसवराज बोमई यांनी दिला आहे.

    मुंबई – सांगली (Sangli) जिल्ह्यातल्या ४० गावांवर दावा करणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले आहे. त्याला महाराष्ट्राने प्रत्युत्तर दिले. आम्ही एकही गाव देणार नाही. उलट बेळगाव (Belgaon), कारवार, निपाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हणाले.

    सांगली जिल्ह्यातल्या जत (Jat) तालुक्यातल्या ४० गावांनी आम्हाला कर्नाटकमध्ये (Karnataka) घ्या, असा ठराव २०१२ मध्ये केला होता. पाणीप्रश्नाला कंटाळून या गावांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या ठरावाचा आम्ही आता गांभीर्याने विचार करत आहोत. सांगली जिल्ह्यातल्या गावांवर दावा सांगणार आहोत, असा इशारा बसवराज बोमई यांनी दिला आहे.

    महाराष्ट्रातले एकही गाव कुठेही जाणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढू आणि बेळगाव, निपाणी, कारगाव ही गावे मिळवण्याचा प्रयत्न करु, असे बोमई यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, या गावांनी नव्याने कुठलाही ठराव केला नाही. त्यांनी २०१२ मध्ये आम्हाला पाणी मिळत नाही, असा ठराव केला होता. त्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर म्हैसाळ सुधारित योजनेला निधी देण्याचा निर्णय घेतला. आता तात्काळ मान्यता देणार आहोत. तिथे पाणी पोहचणार आहे. सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.