
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार (Nago Ganar) हे विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार (Nago Ganar) हे विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या मतदारसंघात नागो गाणार, सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) विजयी झाले आहेत. अडबाले यांच्या विजयाने भाजपला नागपुरात मोठा दणका बसल्याचे म्हटले जात आहे.
अजनी येथील समुदाय भवनात सकाळी साडेसात वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आल्या. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते
पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना 14071 तर गाणार यांना 6309 मते मिळाली. एकूण सात हजारहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
भाजपने केली होती प्रतिष्ठेची निवडणूक
दहा वर्षांपासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.