‘भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्या’; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

    चंद्रपूर – लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु असून जहरी टीका केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील करुन घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांचे जुळून न आल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे नारा दिला. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

    चंद्रपूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले आहेत की महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप केला. कल्याण, बीड, बुलडाणा अशा काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

    कोल्हापूरच्या राजकारणामध्ये संजय मंडलिक यांनी टीकेची झोड उठवली आहे. मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांच्यावर दत्तक वंशज असल्याचा आरोप केला आहे. यावरुन देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हू महाराज कोण आहे. त्यांचं कुटुंब कोण आहे. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे. त्यामुळे जगाने मान्य केल्यावर दोन गाढवांनी त्यावर कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावं असं मला वाटत नाही.’, असे म्हणत त्यांनी यावर जास्त बोलणं टाळलं.