महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही – मंत्री अब्दुल सत्तार

इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं.

    बीड :‘एमआयएम’चे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)यांनी महाविकास आघाडीमघ्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांन उधाण आले आहे. याबाबत आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की,  जलील प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आहे. त्या दोघांचा निर्णय तीनही पक्षांना मान्य राहील. तर महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही. त्यांचा तो चकवा आहे. असं वक्तव्य देखील अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

    इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं. असं टोपे यांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा होऊ लागली आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत इमतियाज जलील यांनी स्वतःचा प्रस्ताव मांडला असून त्याला अंतिम रूप देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं असल्याचं सांगितलं आहे.