महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठाकरे

सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

उस्मानाबाद (Usmanabad).  सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

उस्मानाबादमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,. चांगल्या गोष्टीसाठी बदल झाला पाहिजे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भाजपचे इतर नेत्यांनीही सरकार बदलासंदर्भात बोलणे बंद केले तर ते चांगले ठरेल, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाही, अजून खूप निवडणुका बाकी आहेत. महाविकास आघाडी जिंकली आहे. मात्र, अजून मुख्य लढाई बाकी आहे.

जनतेने हैदराबादमध्ये काय कौल दिला, हे सर्वांसमोर आहे. भाजपच्या जागांमध्ये दसपटीने वाढ झाली आहे. मात्र, आम्ही विधानपरिषदेतील पराभवासंदर्भात जरुर आत्मचिंतन करु, असे दरेकर यांनी म्हटले.