devendra fadanvis

महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. आता विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा ताण वाढला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे(Mahavikas Aghadi in trouble due to Devendra Fadnavis).

  मुंबई : महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. आता विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा ताण वाढला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे(Mahavikas Aghadi in trouble due to Devendra Fadnavis).

  संख्याबळ पाहता भाजपचे ४ उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, मात्र भाजपने ५ अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. तसेच सदानंद खोत यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याची घोषणा केली असून महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे करिष्माई नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आघाडीचे नेते अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या २८७ आहे. त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघे तुरुंगात आहेत. १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी २७ मतांची आवश्यकता असेल.

  बिनविरोध निवडणुकीसाठी आघाडीचा प्रयत्न

  राज्यसभा निवडणुकीत अडचणी निर्माण केल्यानंतर आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आघाडीच्या नेत्यांची इच्छा आहे. मतदान गुप्त पध्दतीने होणार आहे. त्यासाठी भाजपच्या ५ जणांसह त्यांचे सहावा उमेदवारही विजयी होतील, अशी भीती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने उमेदवारी मागे घ्यावी, असे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीचाही धोका निर्माण झाला असून, काँग्रेसच्या उमेदवारालाही आपला फॉर्म मागे घ्यावा लागणार आहे, त्यादृष्टीने महाविकास आघाडीत मंथन सुरू आहे.

  ‘वर्षा’ निवासस्थानी खलबते

  १० जून रोजी मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ११ जून रोजी पहाटे निकाल लागला आणि धनंजय महाडिकांनी मैदान मारले. या पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरु झाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आता शिवसेनेचे चिंतन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

  विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरणार?

  ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीला संजय राऊत यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब यांची हजेरी आहे. या बैठकीत सहाव्या जागेवर झालेल्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच अपक्ष आमदार शिवसेनेपासून का दुरावले? याबाबतही या बैठकीत चर्चेची शक्यता आहे. त्याचबरोबर अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीतील रणनितीबाबतही या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.