
अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नागपूर– राजीनामा द्या.. राजीनामा द्या…अब्दुल सत्तार राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे… गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को… ५० खोके एकदम ओके… सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके… वसुली सरकार हाय हाय… श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या… अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपुरातातील हिवाळी अधिवेशन हे अनेक कारणांवरुन गाजत आहे ते, या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक ऐकमेकांची उणीधुणी काढत चिखलफेक करत आहेत. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत.
अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. तर ‘ईएस’ वरुन विरोधक आक्रमक होत आहेत. दरम्यान, आज अधिवेशनाचा दुसरा आठवड्या असताना, आज विरोधकांनी सहाव्या दिवशी विधानभवनाच्या पाऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून, वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने केली.