संजय राऊतांच्या मूर्खपणामुळे महाविकास आघाडी राजकीय संकट; एकनाथ शिंदे प्रकरणावर भापची टीका

शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले आहे .महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारे समीकरणे बदलत आहेत, ते पाहता आता महाराष्ट्रातही मध्यप्रदेश, कर्नाटकप्रमाणेच सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी या संकटाचे खापर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर फोडले आहे(Mahavikas Aghadi political crisis due to Sanjay Raut).

    महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला संजय राऊत जबाबदार आहेत. उद्धव यांच्या शिवसेनेतील बंडखोरीचे कारण भ्रष्टाचार आहे, तिथे ज्या प्रकारे भ्रष्टाचार होत होता, त्यामुळे तेथील आमदारांना चांगलीच लाज वाटली.

    या भ्रष्टाचारामुळे बंडखोरी झाली आहे. आता कदाचित उद्धव ठाकरेंचा अहंकार कमी होईल. इतर राजकीय पक्षांनीही यातून धडा घ्यायला हवा असेही कैलास विजयवर्गीय म्हणाले.