Mahavikas Aghadi's seat allotment preparations completed; Consensus on 39 out of 48 seats in the state; Information given by Sharad Pawar

Sharad Pawar In Kolhapur : शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर येथे एका शाळेच्या कार्यक्रमात आले होते. यानंतर आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण कोल्हापूरला आल्याचे कारण सांगत शाहू महाराजांची भेट न झाल्याने त्यांची भेट घ्यावी याकरिता  न्यू पॅलेस येथे भेट घेतली. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा प्रश्न जवळजवळ पूर्ण झाल्याचे सूतोवाच करीत, महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.

  Sharad Pawar In Kolhapur : शिवजयंतीनिमित्ताने शरद पवार काल कोल्हापुरात एका शाळेच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांची अपेक्षा होती शाहू महाराज आणि मालोजी राजे यांची भेट होईल परंतु ते बाहेर गेलेले असल्याने कार्यक्रमाला येऊ शकले नाही. यानिमित्त ते न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लोकसभेच्या जागावाटपावरून 48 पैकी 39 जागांवर एकमत झाल्याचे सांगितले. उरलेल्या जागांकरिता पुन्हा उद्या तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते बसून जागावाटपावरून उरलेला जागांचा तिढा सोडवणार आहेत. तरीही जागावाटपांचा तिढा नाही सुटला तर या तीनही पक्षातील महत्त्वाचे नेते हा उरलेल्या 3-4 जागांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.

  लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं

  महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते राजकीय पक्षात सामील झालेले त्यांना पाहिलेले नाही, असे शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

  महायुतीला शरद पवारांचा उपरोधित टोला
  शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झाले आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ. भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटते हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा उपरोधित टोलाही शरद पवारांनी लगावला.

  शिवछत्रपतींचा पुतळा थोरले शाहू महाराजांनी बसवला

  पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असं मी म्हणालो. मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही. तर आज कोल्हापुरात आलो तर भेट घ्यावी.

  मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले शरद पवार ?
  आम्हा लोकांचे सरकार होते. ते उच्च न्यायालयात गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, असे शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना म्हणाले. ज्यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरु केला. ते उद्या याबाबत बोलणार आहेत. त्यामुळे ते बोलल्यानंतरच मी त्याबाबत माझे मत मांडेल, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.