Mahavitaran recovery campaign; 305 crore arrears in Baramati mandal; Maha distribution appeal to avoid action by paying electricity bill

  बारामती : महावितरणच्या बारामती मंडलांतर्गत भोर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर व इंदापूर तालुक्यात बिगरशेती वीजग्राहकांची थकबाकी ३०५ कोटींवर गेली असून, ती वसूल करण्यासाठी कंपनीने धडक वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या चालूसह थकीत वीजबिलांचा भरणा तत्काळ करावा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा महावितरणने दिला आहे.

  बारामती मंडलातील तीन विभागातील थकबाकी

  बारामती मंडलात महावितरणचे बारामती, केडगाव व सासवड असे तीन विभाग आहेत. बारामती विभागात थकबाकीदार ग्राहकांची संख्या ५१०५० इतकी असून, त्यांच्याकडे १८३ कोटी थकले आहेत. त्यात घरगुती ४१९३२ (३ कोटी ६१ लाख), व्यावसायिक ४६९८ (१ कोटी ५ लाख), लघुदाब औद्योगिक ५८८ (६४ लाख), दिवाबत्ती १६७९ (१२१ कोटी ४९ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ३९९ (५४ कोटी ८० लाख), सार्वजनिक सेवा १३३३ (१ कोटी ३९ लाख) व इतर वर्गवारीच्या ४२१ ग्राहकांकडे १० लाख असे मिळून थकबाकीचा आकडा १८३ कोटींवर गेला आहे.

  केडगाव विभागातील थकबाकी

  केडगाव विभागात थकबाकीदार ग्राहकांची संख्या ६२१४३ इतकी असून, त्यांच्याकडे ९० कोटी २२ लाख थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ५२६८६ (६ कोटी ८२ लाख), व्यावसायिक ५०७४ (१ कोटी ७९ लाख), लघुदाब औद्योगिक १०४५ (१ कोटी ६६ लाख), दिवाबत्ती ११३८ (४४ कोटी १४ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ४२४ (३३ कोटी ७ लाख), सार्वजनिक सेवा १२२८ (२ कोटी ४० लाख) व इतर वर्गवारीच्या ५४८ ग्राहकांकडे ३२ लाख असे मिळून थकबाकीचा आकडा ९० कोटींवर गेला आहे.

  तर सासवड विभागात ३१९९९ वीजग्राहकांकडे ३२ कोटी २८ लाख थकबाकी आहे. आहेत. त्यात घरगुती २६९४४ (२ कोटी ४२ लाख), व्यावसायिक २४११ (७५ लाख), लघुदाब औद्योगिक ३०७ (१९ लाख), दिवाबत्ती ८३९ (१६ कोटी ४ लाख), सार्वजनिक पाणीपुरवठा ३६१ (११ कोटी ४१ लाख), सार्वजनिक सेवा ७५९ (१ कोटी २४ लाख) व इतर वर्गवारीच्या ३७८ ग्राहकांकडे २० लाख असे मिळून थकबाकी ३२ कोटी २८ लाख इतकी झाली आहे.

  शाखा निहाय पथके तयार

  वीजबिल वसूलीसाठी महावितरणने शाखा निहाय पथके तयार केली असून, ग्राहकाच्या दारात जाऊन वसूली केली जात आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाला की तो सुरु करण्यासाठी पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे वीजबिल घरबसल्या ऑनलाईन किंवा नजीकच्या वीजबिल भरणा केंद्रावर तात्काळ भरुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.