महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे कल्याणमध्ये दोन दिवस काम बंद आंदोलन

कंत्राटदार बाजूला करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा. पगार वाढ करावी आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगार द्यावा.

    कल्याण : महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासनाने महावितरण, महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटदारांवर होणाऱ्या प्रशासकीय खर्चात कपात केल्यास दर वर्षी सुमारे 2 अब्ज 32 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात. यासाठी कंत्राटदार बाजूला करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा. पगार वाढ करावी आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगार द्यावा. त्याचबरोबर अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी 9 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात वीज निर्मिती केंद्र आणि वितरण ऑफिसवर काम बंद आंदोलन सुरू आहे.

    आज पाचव्या टप्यात राज्यभर कामगारांनी उत्साहात दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कल्याणमध्ये महावितरणाच्या तेजश्री या कार्यालयाबाहेर या कंत्राटी कामगारांनी दोन दिवस काम बंद करत निदर्शने केली. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास 5 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगरांनी दिला.