mahavitran bribe

नवी मुंबईत (Navi Mumbai) शहरात लाचखोरीच्या घटनांना लगाम लागल्याचे दिसत असताना आता पुन्हा एकदा लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत वीज वितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र जाधव हा जाळ्यात सापडला आहे.

    नवी मुंबई: महावितरणचा (Mahavitran) अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र जाधव (Ravindra Jadhav) हा 15 हजारांची लाच घेताना सापडला आहे. मीटर रीडिंग, बिल प्रिंटिंग वितरणची देयके घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून देयकांसाठी समाधानकारक असा शेरा द्यावा लागतो. असा शेरा मारून घेण्यासाठी या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 20 हजाराची मागणी केली होती. अखेर तडजोडी अंती 15 हजारांची लाच (Bribe) घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. (corruption)

    नवी मुंबईत (Navi Mumbai) शहरात लाचखोरीच्या घटनांना लगाम लागल्याचे दिसत असताना आता पुन्हा एकदा लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत वीज वितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र जाधव हा जाळ्यात सापडला आहे. गेल्या काही महिन्यात नवी मुंबई शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांनी उत आणला होता. तर काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा एसीबीने धडक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे.

    नेमका प्रकार काय ?
    मीटर रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वितरणाची कामाच्या थकीत देयकस समाधान कारक शेरा मारून ते पुढे पाठविण्याकरिता 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15,000 रुपये लाच स्वीकारन्याचे मान्य करूनअतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण वाशी ( वर्ग 1) रविंद्र केशवराव जाधव याना लाच स्विकारताना सापळा कारवाई दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील व त्यांचे पथक कोळी ,तारी ,लोटकर ,पोटे यांनी कारवाई केली आहे.