संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

    धाराशिव : दिवाळीच्या सणामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्बल तीनवेळा भेट झाली. त्यामुळे काका-पुतण्यांचे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अजित पवारांबद्दल एक विधान केले.

    बावनकुळेंना पत्रकारांनी अजित पवारांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ”अजित पवार अत्यंत चांगले नेते आहेत. यांच्याविषयी आमच्या मनात कोणतीही वेगळी भावना नाही. ते चांगल्याप्रकारे महायुतीचं काम करत आहेत. त्यांच्या रूपाने एक चांगले नेते महायुतीला मिळाले आहेत”.

    चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, ”तीन-तीन बॅट्समन महायुतीमध्ये आहेत. कालही आपण मॅच जिंकलो आणि फायनलही जिंकू. महायुतीमध्ये तिघेही नेते बॅट्समनही आहेत आणि बॉलरही आहेत. त्यामुळे काळजी करू नका. या महाराष्ट्रात शतकेच शतके होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला शतकं पाहायला मिळाली. निवडणुका लागल्या तर महापालिकेतही आणि इतरही ठिकाणी तुम्हाला शतकंच पाहायला मिळतील”.