महेश शिंदेंनी बजावली आधुनिक श्रावण बाळाची भूमिका! कृष्णा खाेरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवडीनंतर माता पित्यांचे केले पूजन

उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत महेश शिंदे यांनी खटाव येथील निवासस्थानी वडील संभाजीराजे जिजाबा शिंदे व मातोश्री शीला शिंदे यांचे पाद्यपूजन करून आधुनिक श्रावण बाळाची भूमिका बजावली. पश्चिम महाराष्ट्राच्या भगिरथाची भूमिका बजावण्यासाठी आईवडीलांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

    कोरेगाव : ‘वन वॉटर ड्रॉप अँड मोअर क्रोप’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात जलसंधारणाची चळवळ व्यापक करत आहेत, त्याचाच धागा पकडून महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कृष्णा खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या विश्वासाने आ. महेश शिंदे यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली असून या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देखील बहाल केला आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत महेश शिंदे यांनी खटाव येथील निवासस्थानी वडील संभाजीराजे जिजाबा शिंदे व मातोश्री शीला शिंदे यांचे पाद्यपूजन करून आधुनिक श्रावण बाळाची भूमिका बजावली. पश्चिम महाराष्ट्राच्या भगिरथाची भूमिका बजावण्यासाठी आईवडीलांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

    खटाव येथील निवासस्थानी झालेल्या या हृदसाेहळ्यात शिंदे यांना पाहून आई शिला शिंदे या भावूक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. जाखणगाव सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि भावी पिढी बलशाली घडविण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिश्रम घेतलेल्या सर्वसामान्य शिक्षक असलेल्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार शिंदे यांच्यावर झाले आहेत, ते कायम त्यांच्या कृतीतून दिसत असतात.