मायणीत मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले१४ वर्षे प्रयत्नशील असणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे -पाटील हे दि. १६रोजी खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून मायणी येथे जरांगे- पाटील यांची तोफ धडाडणार ते या सभेत काय मार्गदर्शन करणार याची सर्वांना उत्सुकता लागली असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची असल्याची माहिती मायणी मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    मायणी : मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले१४ वर्षे प्रयत्नशील असणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे -पाटील हे दि. १६रोजी खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून मायणी येथे जरांगे- पाटील यांची तोफ धडाडणार ते या सभेत काय मार्गदर्शन करणार याची सर्वांना उत्सुकता लागली असून त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची असल्याची माहिती मायणी मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    मायणीमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ७ सप्टेंबर पासून सलग बारा दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनात तालुका ,जिल्हासह बाहेरील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून हे आंदोलन यशस्वी केले होते. येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे- पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याची देही याची डोळा चर्चा करण्याचे भाग्य लाभले होते. मनोज जरांगे पाटील यांचा संभाजीनगर दौरा ठरला होता व मायणीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीनुसार मायणी येथे झालेल्या साखळी उपोषणाचे फलित म्हणून जरांगे-पाटलांनी मायणी येथे सभा घेण्याचे तात्काळ मान्य केले.

    दि. १६ नोव्हेंबर रोजी जरांगे पाटलांची या दौऱ्यातील पहिली सभा दहा वाजता दौंड येथे असून तेथून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर मायणी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवासादरम्यान अन्य कोठेही सभा नाही. मायणी व परिसरातील मराठा कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी त्यांनी भरपूर वेळ दिला असून त्यांचा त्या दिवशी मायणी येथे मुक्काम असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क दौऱ्यास मायणीपासून प्रारंभ करण्याचा शब्द जरांगे पाटील यांनी दिला होता.

    मायणी ता. खटाव येथे सदर सभेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी पाच वाजता नियोजित वेळी सभा होणार आहे. या सभेसाठी मायणी- चितळी रोडवरील अकॅडमीच्या मैदानावर सदर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. 45 हेक्टर जमिनीवर जवळपास दोन लाख लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मायणी व परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सुमारे शंभर एकर परिसरात स्वतंत्र वाहनांच्या पार्किगची व्यवस्था करण्यात आली आहे. मायणी ग्रामपंचायत मार्फत पाणी व्यवस्था, आरोग्य विभागामार्फत आरोग्य खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार असून रुग्णवाहिकाव  अग्निशमन दलास देखील पाचारण करण्यात येणार आहे. जवळपास दीड हजार स्वयंसेवक नेमण्यात आले असून १२५ केवीचे पाच जनरेटर, १२ हॅलोजन चा एक टॉवर असे एकूण दहा टॉवर उभारण्यात येणार आहेत. पार्किंग व्यवस्था स्टेज जवळ करण्यात येणार आहे .तसेच मनोज जरांगे पाटील यांना आल्यानंतर थेट स्टेजवर उपस्थित राहता येईल अशी योजना करण्यात आली आहे .तरी या सभेस सकल मराठा बांधव व इतर समाज बांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. विकास देशमुख व खटाव तालुका समन्वयक बाबा शिंदे यांनी केले आहे.