लोकशाहीमध्ये बहुसंख्याकवाद घातकच ; नास्तिक परिषदेत विविध वक्त्यांचे मत

लोकशाहीमध्ये बहुसंख्याकवाद हा नेहमी घातकच ठरत असतो. तो धर्माचा, जातीचा, उपजातीच असू शकतो.त्यापेक्षा विवेकवादाची परंपरा भारतीय आहे. त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मत विविध वक्त्यांनी केले.

    सांगली : लोकशाहीमध्ये बहुसंख्याकवाद हा नेहमी घातकच ठरत असतो. तो धर्माचा, जातीचा, उपजातीच असू शकतो.त्यापेक्षा विवेकवादाची परंपरा भारतीय आहे. त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मत विविध वक्त्यांनी केले.
    नास्तिक परिषदेत ‘बहुसंख्यावाद व धार्मिक हिंसाचाराला सामोरे जाताना’ या विषयावर तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पर्यावरणवादी नेते विश्वंभर चौधरी यांनी मते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केले. कुमार केतकर म्हणाले, बहुसंख्याकवाद हा जातीचा, धर्माचा, उपजातीचा असू शकतो. हे विवेक नाही. सध्या समान नागरी कायदा, तिहेरी तलाक हे मुद्दे आणले जात आहेत. वास्तविक पाहता हे मुद्दे सर्वांचे नाहीत. प्रापर्टीचे मुद्दे यामध्ये येतात. आपल्या देशात समानता अशक्य आहे.
    विश्वंभर चौधरी म्हणाले, आपली राज्यघटना ही श्रेष्ठ आहे. जगातल्या कोणत्या राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन सांगितलेला नाही. नागरिकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे. परंतु कोणत्याही धर्माला मोकाट स्वातंत्र्य देण्यात आले नाही. देशाचा पाया हा राज्यघटना आहे. परंतु शाळेमधून तो शिकवला जात नाही. यापुढे नागरिकशास्त्र 100 मार्काचे असेल तर राज्यघटना 50 मार्काचे शिकवले पाहिजे. आपले सर्व कायदे हे सर्वांसाठी सारखे आहेत. परंतु परंपरांना एकत्र बांधून ठेवता येत नाही. त्यामुळे धर्माऐवजी विवेकवादा स्वीकारला पाहिजे. कारण हा विवेकवाद हा भारतीय परंपरेतील आहे. चार्वाकापासून विवेकवादाचा सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये विवेकवादी होणे हे आव्हान आहे. परंतु विवेकवाद जोपासण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे. विज्ञानवाद वाढवत नेल्यास विवकेवाद वाढत जाईल. परंतु आपल्या समाजात विज्ञानवाद रुजविला गेला नाही. त्यामुळे भोंदुगिरी वाढत आहे. परंपरेची चिकित्सा केली जात नाही. धर्माची चिकित्सा झाली पाहिजे.
    तुषार गांधी म्हणाले, लोकशाहीत बहुसंख्याकवाद हा घातकच आहे. त्यामुळे धर्मविहीन होण्याची गरज आहे.संस्कृतीच्या नावाखाली गांधीजीची हत्या करणार्‍याचा उदोउदो केला जातो. हे चुकीचे आहे. संस्कृतीमध्ये महिला या शैतान आहेत, असे बिंबवले जाते. तरीही महिला त्यांना प्रश्न विचारताच धर्माचे वाहक म्हणून काम करतात. त्यामध्ये महिलांचे शोषणही होत असते. हे सर्व थांबण्यासाठी धर्मविहीन झाले पाहिजे.