हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करा, भाजपची कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे मागणी

या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, सरचिटणीस तुकाराम जाधव यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे.

    देहूरोड – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातही वॉर्डांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यासह १० ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करावी तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पाच हजार तिरंगा ध्वजांचे वाटप करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

    या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, सरचिटणीस तुकाराम जाधव यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. देशाचा दैदिप्यमान इतिहास नागरिकांच्या मनात तेवत रहावा आणि त्यांच्या मनात देशप्रेमा राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असे आवाहन केले.

    पाच हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करा
    हे अभियान यशस्वी करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीत जनजागृती करावी. तसेच दहा ऑगस्टला शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी. स्थानिक नागरिकांना पाच हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करावे, असे शेलार आणि जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.