दुकानावरील पाट्या १५ दिवसात मराठी करा, नगर मनपाचा दुकानदारांना इशारा

दुकानदारांना 15 दिवसांची मुदत (15 days given for Marathi language board)  देण्यात आली आहे. त्यानंतर दुकाने व आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा (Warning to take action) देण्यात आला आहे. जर या मुदतीत मराठी पाट्या दिसल्या नाहीतर रितसर कारवाई होणार असल्याचा इशारा नगर मनपाने Ahmednagar Palika) दिला आहे.

    अहमदनगर : राज्यात मागील काही वर्षापासून दुकानांवरील मराठी पाट्यावरुन (Shop Marathi board) बरेच राजकारण रंगले होते. मुंबईत सुद्धा मराठी पाट्यावरुन अनेक राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. तसेच वारंवार हा मुद्धा बाहेर काढला जातोय. आता नगर पालिका (Ahmednagar Palika) दुकानांवरील मराठी पाट्या आक्रमक झाली आहे. शहरातील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाटय़ा मराठी भाषेतच (Only in Marathi language board) करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. यासाठी दुकानदारांना 15 दिवसांची मुदत (15 days given for Marathi language board)  देण्यात आली आहे. त्यानंतर दुकाने व आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा (Warning to take action) देण्यात आला आहे. जर या मुदतीत मराठी पाट्या दिसल्या नाहीतर रितसर कारवाई होणार असल्याचा इशारा नगर मनपाने (Ahmednagar Palika) दिला आहे.

    दरम्यान, राज्यामध्ये अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये आस्थापनांच्या पाटय़ा मराठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाटय़ा मराठी भाषेत असाव्यात, असा राज्य सरकारने आदेश दिला आहे. त्यामुळे नगर शहरात त्याची अंमलबजावणी केव्हा होणार, अशी विचारणा होत होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी महानगरपालिकेने पत्रक काढून आस्थापनांच्या पाटय़ा मराठीत करण्याचा आदेश जारी केला आहे. आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावरील फलक मराठी भाषेत सुधारित तरतुदीनुसार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 15 दिवसांची मुदत यासाठी देण्यात आली आहे. 15 दिवसांत मराठी पाट्या दिसल्या नाहीतर रितसर कारवाई होणार असल्याचा इशारा नगर मनपाने दिला आहे. त्यामुळं आता दुकानदार सुद्धा मराठी पाट्यासाठी कामाला लागले आहेत.