देशातील सिंधुदुर्ग श्रीमंत जिल्हा बनवू, कोकणातूनही अदानी, अंबानी व्हावेत – केंद्रीय मंत्री नारायण राणे

स्पर्धेच्या युगात आपली आर्थिक उन्नती साधावी. या दृष्टीने ५५०० आर्थिक मदतीतून हा उद्योग सुरू करावा हा या मागचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती महिला योजना आणली आहे .

  आपल्या उद्योग व्यवसायाची प्रगती साधून नामधारी व्यवसाय न करता यशस्वी उद्योजक बदलाच्या दृष्टीने निर्धार करा. जगात चायना अमेरिका सारख्या प्रगत देशात भारत देशातील सिंधुदुर्ग जिल्हा देशात श्रीमंत जिल्हा झाला पाहिजे. या दृष्टीने या प्रशिक्षणातून परदेशातही बाजारपेठ मिळून आपला आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधा, जेणेकरून जिल्हयाचा उत्पन्न दर वाढवा, जेणेकरून कोकणातूनही अदानी अंबानी निर्माण झाले पाहिजेत. या दृष्टीने प्रयत्न करा असे आव्हानात्मक प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

  मास्टरकार्ड पुरस्कृत लर्निंग लिंक फाउंडेशन मार्फत सिंधुदुर्ग येथील जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी महिला उद्योजक कार्यशाळा महिला सशक्ती परिसंवाद संपन्न झाला. यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रशिक्षणार्थी उद्योजकांना उद्योजक अनुदान चेकद्वारे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, दीप्ती मोरे, लर्निग लिंक फाउंडेशनचे सुदीप दुबे, व्हाईस प्रेसिडेंट असिमा सिंग, माजी जि प अध्यक्षा संजना सावंत, सुप्रिया वालावलकर, प्रज्ञा ढवण, साक्षी कोचरेकर, भक्ती पळसमकर आदी मान्यवर याच्यासह जिल्ह्यातील १९० महिला नव उद्योजक उपस्थित होते आणि प्रास्तविक सुदिप दुबे यांनी केले. यावेळी मास्टर कार्ड फायनान्स कंपनी सुशक्ती महिला उद्योजक यांच्यासाठी देण्यात आलेल्या प्रशिक्षण व्यवसायाबाबत व आर्थिक प्रगती सध्याच्या दृष्टीने १९० महिला उद्योजक आयोजनासाठी पात्र ठरले असून ३५ महिला उद्योजक जोडण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
  सिंधुदुर्ग जिल्हातील १३०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामधील १९० महिलांना ५५०० रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. प्रतिनिधीक स्वरूपात तीन महिलांना गौरविण्यात आले. जिल्ह्यात ज्या महिलांनी उद्योग व्यवसायात चांगले काम केले आहे व संस्थेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशा महिलांना ही आर्थिक मदत करण्यात आली. या परिसंवादामध्ये महिलांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले.

  जिल्हातील महिलांनी अनेक व्यवसायात प्रगती केली असून मार्केटिंगची अडचण अनेक महिलांनी व्यक्त केली. कुकूटपालन, खानावळ, बेकरी, शेळीपालन पार्लर, सरबत, मसाले, विद्यार्थी क्लास, कॅटरिंग, अगरबत्ती व मेणबत्ती, काथ्या उद्योग, कृषी सेवा केंद्र, भाजीपाला, लाकडी वस्तू, गांडूळ खत, पापड, टेलरिंग, ज्वेलरी, आदी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी आपली ओळख व आपल्या उद्योगांची ओळख करून दिली. लर्निंग लिंकच्या अपूर्वा शिंदे यांनी प्रत्येक उदयोजक महिलेशी संवाद साधला. काही व्यवसाय कल्पक व नवनिर्मीत असून नावीन्यपूर्ण असल्याने सर्वांनीच चांगली दाद दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, महिला सबलीकरण महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण महिलांनी यशस्वी उद्योजक बना संगणक डिजिटल उत्पादन वाढीचे मार्गदर्शन देणारी ही संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून १,३०० महिलांचा या प्रशिक्षणास समावेश होता. त्यातून १९० महिला निवडण्यात आल्या. महिला सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संस्था निवड केली असून येथील उत्पादित बालापासून महिलांच्या आर्थिक उन्नती करण्यासाठी उद्योजक बनावे या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

  आपण निवड केलेले व्यवसाय यामध्ये मास्टर लिंक व मार्केटिंग बाबत मार्गदर्शन केले जाईल. आपला व्यवसाय हा नामधारी व्यवसाय असता कामा नये हे यातून आर्थिक उन्नती प्रगती साधण्यासाठी योग्य निर्धार करा आणि उद्योजक बना. आजच्या या दोनशे महिलांमधून किती महिला यशस्वी उद्योजक बनवतील उलाढाल करतील हे लवकरच आपण एक कार्यक्रम घेऊन माहिती घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेतून १८ बलुतेदारांसाठी गावागावात असलेले व्यवसाय कारागीर यांची शिल्प करा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण उद्योजक वाढीसाठी प्रयत्न केले. ३,२५,००० कर्ज उपलब्ध करून देऊ यासाठी उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंबा, काजू, नारळ व्यवसायामधून आर्थिक प्रगती साधण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केले. परंतु यशस्वी उद्योजक बनले नाहीत. मास्टर कार्ड लिंकच्या माध्यमातून या महिला उद्योजकांनी व्यवसाय आणि आपले प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करा.

  स्पर्धेच्या युगात आपली आर्थिक उन्नती साधावी. या दृष्टीने ५५०० आर्थिक मदतीतून हा उद्योग सुरू करावा हा या मागचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती महिला योजना आणली आहे . त्यात आपल्या जिल्ह्यातील किती महिला यातून लखपती महिला योजनेत सहभागी होतात हे दिसून येईल. पद आणि प्रतिष्ठा बरोबर उद्योजकातूनही मिळू शकते पण हे नामदारी असते. त्याचा आपण विचार न करता उद्योजकातून आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करा. आपले दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा. प्रदेशातून जास्तीत जास्त व्यवसायाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केल्यास आपला देश आर्थिक उन्नत देश म्हणून श्रीमंत जिल्हा म्हणून नावावर उदयास आला पाहिजे. यातूनच यशस्वी उद्योजक म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अदानी अंबानी बनावेत हा या मागचा उद्देश असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी स्वामिनी फूड व्यवसायातून सुरू केलेल्या उद्योगाबाबत मधुरा धुरी आणि जीवदानी माणगावकर यांनी आपले व्यवसायातील अनुभवाचे बोल बोलून दाखवले. तसेच यशस्वी उद्योगासाठी सहकार्य करण्याचे मार्गदर्शन करण्याचे विचारही व्यक्त केले. यातूनच जिल्ह्यातील नुसती पापड लोणची व्यवसायकडे न राहता कुकुटपालन लाकडी खेळणी उद्योग शेळीपेंडी पालन अगरबत्ती सेंद्रिय शेतीविविध मसाले गोमूत्र जीवामृत यासारखे विविध उद्योग करत असल्याचे बोल उपस्थित महिलांमधून व्यक्त करण्यात आले यातून सिंधुदुर्ग जिल्हा भविष्यात आर्थिक प्रगत जिल्हा म्हणून होण्यासाठी या महिलांमधून प्रगती साधली जाईल असे दिसून आले.