jawhar

‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ संकल्पनेनुसार लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून (Health Department) प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा (Family Planning Operation) भार महिलांवर ढकलून पुरुष नामानिराळे राहत असल्याची माहिती २०१८ ते २०२३ च्या जिल्हा अहवालातून पुढे आली आहे.

  संदीप साळवे, जव्हार: जव्हारसारख्या (Jawhar) ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य विभाग सक्रियपणे काम करीत आहे. कुटुंब नियोजन (Family Planning) सुखी कुटुंबासाठी किती आवश्यक आहे हे आता ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबाला समजायला लागले आहे. (Palghar News) मात्र कुटुंबात आजही पारंपारिक मानसिकतेमुळे स्त्रीलाच शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

  ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ संकल्पनेनुसार लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून (Health Department) प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा (Family Planning Operation) भार महिलांवर ढकलून पुरुष नामानिराळे राहत असल्याची माहिती २०१८ ते २०२३ च्या जिल्हा अहवालातून पुढे आली आहे.

  ज्या जोडप्यांनी कुटुंब नियोजनाचा अवलंब केला नाही. त्यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी प्राथमिक व नागरी आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांत संपर्क साधावा. कुटुंब नियोजन पद्धतीची निवड करून लोकसंख्या स्थिरतेला हातभार लावावा

  - डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार

  जव्हार तालुक्यात लहान कुटुंबांची संख्या तशी कमीच आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाव्हियात एक बालक जन्माला आले आणि जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली. याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने १९८९ पासून ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. यंदा जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शासनाचे घोषवाक्य ‘स्वीकारा कुटुंब नियोजनाचा उपाय, लिहा प्रगतीचा नवा अध्याय’ हे आहे.

  आरोग्य विभागाच्या वतीने ११ ते २४ जुलै २०२२ पर्यंत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. अफाट लोकसंख्या वाढीचा परिणाम भारतासारख्या एका देशावर नव्हे संपूर्ण जगावर किंवा मानव जातीवर किंवा पृथ्वी या ग्रहावरच होणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, पेयजलाची कमतरता, शहरांत वाढलेले जागेचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. प्रत्येक शिक्षित व्यक्तीने कुटुंब नियोजन उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला तर या भागातील लोकसंख्या नियंत्रणात राहून कुपोषण,बेरोजगारी,दारिद्र्य यांसारख्या गोष्टीला आळा बसू शकेल.

  *पुरुष व स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ( टाक्याची किंवा बिन टाक्याची),तात्पुरती पद्धतीत तांबी, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन व निरोध वापर याचा समावेश होतो. यासाठी जोडप्यांना आरोग्य विभागामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना व आर्थिक मोबदला दिला जातो.

  जव्हार तालुका आरोग्य विभागाकडून सन २०१८ पासून उद्दिष्टांपेक्षा अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

  सन       उद्दिष्टे एकुण पुरुष  दोन शस्त्रक्रिया  शस्त्रक्रिया अपत्यावर शस्त्रक्रिया

  १८-१९       ४४७         ६९३            १९         १९८
  १९-२०.      ४४४        ४४२            २९        १४७
  २०-२१.      ४४७        ६५९             ०९       २१५
  २१-२२.     ४४७        ६८५              २३       २२१
  २२-२३.     ४४७       ४०४               ००      १९६
  एकुण     २२३२        २८८३                ८०      ९७७