sanjay raut

या सभेबाबत राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. सभेविषयी देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरे या देशातील घडामोडीवर, महाराष्ट्रातील घडामोडीवर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मालेगावच्या सभेकडे राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.

मालेगाव– आज मालेगामध्ये ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. एकिकडे पक्ष व चिन्ह यांचा निकाल न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे. तर सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, आता शिंदे गटाने (Shinde Group) खेडमध्ये जोरदार सभा घेतल्यानंतर आता ठाकरे गटाकडून आज रविवार (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार असून, या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेचा दोन दिवसांपूर्वी टिझर लॉँन्च करण्यात आला होता, या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दोनच गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी जोरदार टिका उद्धव ठाकरेंवर केली होती, त्याला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) सभेबद्दल सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

ठाकरे गटाची आज (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये आलेत. या सभेची कशाप्रकारे तयारी सुरु आहे, याचा आढावा संजय राऊतांनी घेतला आहे. दरम्यान, या सभेबाबत राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. सभेविषयी देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरे या देशातील घडामोडीवर, महाराष्ट्रातील घडामोडीवर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मालेगावच्या सभेकडे राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीतून मला काही फोन आले. मालेगावच्या सभेविषयी विचारणा केली. रेकॉर्डब्रेक शब्दही कमी पडतील एवढी विराट ही सभा होणार आहे. त्यानुसार तयारी झाली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

विरोधकांनी धसका घेतलाय…

दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सभेचा काही लोकांनी धसका घेतला आहे. त्यामुळ उद्धव ठाकरेंच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे. तुम्ही कितीही अपप्रचार करा. सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणार आहेत. हा लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याने काही होणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं तर मालेगावच्या सभेने या लोकांची हातभर फाटलीय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

राज ठाकरेंच्या आरोपाना उत्तर देणार?

दरम्यान, गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण शिवसेना का सोडली, शिवसेना सोडायाला मला भाग पाडले. याला सर्वंस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर काही गंभीर आरोप केलेत. या आरोपाना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? किंवा आणखी कोणाचा समाचार घेणार? कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काय म्हटलंय टिझरमध्ये?

खेडमध्ये ठाकरे गटाची सभा झाल्यानंतर याला उत्तर म्हणून शिंदे गटाने खेडमध्ये सभा घेत, शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून आज (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी मालेगावमध्ये आलेत. दरम्यान, या सभेचा टिझर लॉँन्च करण्यात आला आहे. “बरं झालं गद्दार गेले…, असं उद्धव ठाकरेंच्या आवाजात म्हणण्यात आलं आहे”. या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.