nawab malik and anil deshmukh

विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांनी मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका दाखल केली होती, परंतू यावर न्यायालयाने निर्णय देताना, या दोघांची याचिका फेटाळून लावली होती. तसेच मतदान करता येणार नाही, असं आपल्या निर्णयात म्हटलं होतं. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव (Supreme court) घेतली आहे.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. तसेच क्रॉस व्होटिंग (Cross Voting) तसेच घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये (BJP and MVA) रणकंदन माजताना दिसत आहे. भाजपा व मविआ या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील चार दिवसांपासून मुंबईत हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच एक एक मतांसाठी भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपाने आजारी आमदारांना सुद्धा मतदानासाठी मुंबईत आणले आहे. तर मविआ सुधा एक-एक मतासाठी झगडत आहे.

    दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Anil Deshmukh and Nawab Malik) यांनी मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका दाखल केली होती, परंतू यावर न्यायालयाने निर्णय देताना, या दोघांची याचिका फेटाळून लावली होती. तसेच मतदान करता येणार नाही, असं आपल्या निर्णयात म्हटलं होतं. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव (Supreme court) घेतली आहे. मलिक आणि देशमुखांचा सर्वोच्च न्यायालयात मतदानाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळं यावर जर आज सुनावणी झाली आणि चारच्या आत मलिक देशमुखांच्या बाजूने निर्णय आला तर, या दोघांना मतदान करता येणार आहे. जर असे झाले तर, याचा फायदा मविआला होणार आहे. पण जर निर्णय उलट आला तर मविआला दोन मते गमवावी लागणार आहेत. त्यामुळं या दोघांना मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा हालचाली सुरु आहेत.

    या दोघांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. त्यामुळं मविआचे नुकसान झाले होते, तसेच याचा फटका मविआला झाला होता. दरम्यान, सकाळी अकरा वाजेयपर्यंत विधानपरिषद निवडणुकीसाठी एकूण १५६ आमदारांचं मतदान पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.