एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय, मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी, तर अनिल देशमुखांना खासगी उपचारासाठी नकार

नवाब मलिकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मलिकांना तुर्तास दिलासा दिला असून त्यांना उपचारासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही, त्यामुळं न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून राज्यात आले आहे, तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सक्रीय झाल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री वेगवेगळ्या गुन्हाखाली जेलची हवा खात आहेत. पण आज न्यायालयाकडून एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय हि परिस्थिती पाहयला मिळाली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. नवाब मलिकांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मलिकांना तुर्तास दिलासा दिला असून त्यांना उपचारासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही, त्यामुळं न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

    दरम्यान, दुसरीकडे मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वैद्यकीय अर्जावर आज न्यायालयानं आपला निर्णय सुनावला. देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर  खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र याला कोर्टाने याला नकार दिला आहे. तुम्ही जे जे रुग्णालयमध्येच उपचार घ्या असा आदेश कोर्टने दिला आहे.

    पुढे आपल्या निर्णयात कोर्टानं असं म्हटलंय की, खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, त्यामुळं खासगी हॉस्पिटलऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रियेस कोर्टानं परवानगी दिली आहे.  ईडीने अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. या दोन वेगवेगळ्या कोर्टाच्या निर्णयामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात असून, एकाला न्याय तर एकावर अन्याय अशी प्रतिक्रिया लोकांतून उमटत आहे.