vitthal idol in bulb

मालवणमधील चित्रकार समीर चांदरकर (Sameer Chandarkar) यांनी १० जुलैला असलेल्या आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती (Vitthal Idol In Bulb) साकारली आहे.  समीर चांदरकर यांनी मातीपासून (Vitthal Idol From Soil) तीन सेंटीमीटर उंचीची मूर्ती तयार केली आहे.

    मालवण : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) प्रत्येकजण आपापल्या परीने विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. मालवणमधील चित्रकार समीर चांदरकर यांनी १० जुलैला असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती (Vitthal Idol In Bulb) साकारली आहे.  समीर चांदरकर यांनी मातीपासून (Vitthal Idol From Soil) तीन सेंटीमीटर उंचीची मूर्ती तयार केली आहे. विशेष म्हणजे एका छोट्याशा बल्बमध्ये त्यांनी ही पांडुरंगाची कलाकृती साकारली आहे. समीर चांदरकर यांना सात ते आठ दिवस प्रयत्न केल्यानंतर अशी मूर्ती साकारण्यात यश आलं आहे.

    अनेक वर्ष अंधारात चाचपडत असलेल्या दीन दुबळ्यांना पांडुरंग मार्ग दाखवत आहे. सगळ्यांचं आयुष्य प्रकाशमय करत आहे.  कदाचित हा संदेश समीर चांदरकर यांना आपल्या कलाकृतीतून द्यायचा असेल.गेली दोन वर्ष कोरोनामुळे विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले आहे. तेच भक्त आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत. सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत.

    दरम्यान आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.  आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं पंढरपुरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपुरात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक वेगळाच आनंद आहे. दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून काल नवमीपर्यंत शहरात जवळपास सात लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते.