एटीएममधील पैसे चोरून नेण्याच्या प्रयत्नातील एकाला अटक; दुसरा आरोपी फरार

तालुक्यातील टेमुर्डा येथील एटीएम मशिनचे कॅमेऱ्याच्या सायरनचे वायर कापून एटीएममधील पैसे चोरून (ATM Cut) नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

    वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा येथील एटीएम मशिनच्या कॅमेऱ्याच्या सायरनचे वायर कापून एटीएममधील पैसे चोरून (ATM Cut) नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

    या घटनेची तक्रार टेंभुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक सिद्धांत संजय नगराळे यांनी 20 ऑक्टोबरला पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याची माहिती कळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

    दरम्यान, पोलिसांनी आरोपी मनिष अमर पाल (येवरा, जी घाटमपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली तवेरा गाडी, मोबाइल असा एकूण 7 लाख 20 हजारांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. याप्रकरणातील दुसरा आरोपी अंकित पाल (वय 20) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.