बापरे! हृदयाची काळजी घ्या…बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू

सचिन तापडिया (44) (Sachin Tapadiya) असे या बॅटमिंटन खेळाडूचे नाव आहे. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन तापडिया यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्यांनी कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

    परभणी : आपल्या हृदयाबाबत अनेक संस्था, संघटना, आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टर आदी जनजागृती करत असतात, तसेच अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना खेळाडूांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच जिममध्ये, कबड्डी खेळतेवेळी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परभणीतून (Parbhani) एक धक्कादायक तसेच हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर येत आहे. बॅटमिंटन (Badminton) खेळताना अचानक एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला व या झटक्याने त्याचा मत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे.

    सचिन तापडिया (44) (Sachin Tapadiya) असे या बॅटमिंटन खेळाडूचे नाव आहे. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन तापडिया यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्यांनी कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तापडियांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी आहेत. सचिन तापडिया यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.