He went to the drain to wash his feet and... School students drowned in the stream due to slippage

अमरावतीच्या मांजरी म्हसला (Manjari Mhasala) गावाजवळ एका युवकाने पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

    अमरावती : गेल्या ४ दिवसांपासून अमरावतीत मुसळधार पाऊस (Heavy Rain In Amravati) सुरु आहे. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच जीव धोक्यात घालून काहीजण पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढताना दिसत आहेत. अशा अनेक घटना पुढे आल्या आहेत. मात्र हा जीवघेणा प्रवास त्यांच्याच जीवावर बेतला (Man Drowned In River) आहे.

    अमरावतीच्या मांजरी म्हसला (Manjari Mhasala) गावाजवळ एका युवकाने पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. मनोज तायडे हा व्यक्ती पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडत होता. पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने त्याला तोल सांभाळता आला नाही. यातच मनोज वाहून गेला. सध्या त्याचा शोध सुरु आहे. मात्र जीवघेणा प्रवास अथवा जीवावर बेतेल असा स्टंट कुणीही करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.