sharad pawar

शरद पवार हे एक आदरणीय व्यक्ती म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखते. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला गेल्या सहा महिन्यात दोन वेळा धमकीचे फोन आले आहेत.

    अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर अमरावतीचा असल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ पिंपळकर हा अमरावतीमधील गोपाल नगर भागात राहणारा आहे. या सौरभ पिंपळकरविषयी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती दिली आहे. सौरभ पिंपळकर यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर क्राईमविषयी तपास सुरु आहे. (Sharad Pawar Death Threat)

    सहा महिन्यात दोन वेळा धमकीचे फोन
    दरम्यान ट्विट आदेश गांभीर्याने घेणे गरजेचे असून अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करणे गरजेचं असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे एक आदरणीय व्यक्ती म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखते. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला गेल्या सहा महिन्यात दोन वेळा धमकीचे फोन आले आहेत.

    एकेरी उल्लेखाचा निषेध -मुश्रीफ
    शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून बोलणे ही आजकाल काही जणांची फॅशन झाली आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो,असेही मुश्रीफ म्हणाले. शरद पवार यांचे वय काय आणि वक्तव्य करणाऱ्यांचे वय काय हे बघा. हे टीव्हीवर आले की लोक टीव्ही बंद करून बसतात. आपण काय बोलत आहोत आणि ते कोणाबद्दल वक्तव्य करतो हे उभा देश बघत आहे, याचा विचार करायला हवा.

    इंटेलिजन्सला गांभीर्याने घ्यायला हवं -मुश्रीफ
    मुश्रीफ म्हणाले की,आता राज्यामध्ये राज्यात शिंदे फडणवीस यांचा सरकार आहे आणि कायदा व सुव्यवस्था पाळणे हे त्यांचे जबाबदारी आहे. ट्विट आदेश गांभीर्याने घेणे गरजेचे असून अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. जमावबंदी असताना देखील कोल्हापुरात लोक जमले. हे जर झाले नसते तर अशी घटना घडली नसती. गृह खात्याने त्यांच्या इंटेलिजन्सला गांभीर्याने घ्यायला हवं. अशा घटना हे सरकार आल्यावरच मोठ्या प्रमाणात घडत आहेत.