आधी गळा चिरून एकाची हत्या केली अन् नंतर ट्रकसमोर येऊन उडी मारून आत्महत्या केली; नागपुरातील घटनेने खळबळ

काचेची बाटली फोडून गळा चिरण्यात आला. त्यानंतर धावत्या ट्रकसमोर उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बेसा पॉवर हाऊस चौकात घडली. शे

    नागपूर : काचेची बाटली फोडून गळा चिरण्यात आला. त्यानंतर धावत्या ट्रकसमोर उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बेसा पॉवर हाऊस चौकात घडली. शेख नसरू (वय 30, रा. ताजबाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेख नसरू हा आईसोबत राहत होता. त्याला दारूचेही व्यसन होते.

    शेख नसरू हा साहित्य तयार करून त्याची विक्री करायचा. यातून मिळालेल्या पैशातून तो आपले व्यसन पूर्ण करायचा. जवळचे पैसे संपल्यावर तो आईकडे पैशांसाठी तगादा लावून भांडण करायचा. त्याची आई ताजबाग परिसरात भीक मागते. शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शेख नसरू हा बेसा पॉवर हाऊस चौकातील टपरीवर बसला होता. या दरम्यान अचानक त्याने तेथे असलेली काचेची बाटली फोडली आणि स्वतःच्या गळ्यावर 6-7 वार करून गळा चिरला.

    दरम्यान, हे दृष्य पाहून त्याच्या शेजारी बसून नास्ता करत असलेल्या राजू मदनलाल गौतम (वय 38, रा. न्यू नरसाळा) यांनी आरडा-ओरड करून त्याला हटकले. लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेल्याचे पाहून नसरूने तेथून पळ काढला. रस्त्यावर जाऊन दिघोरी ते म्हाळगीनगर चौकाकडे जाणाऱ्या ट्रकसमोर उडी घेतली. ट्रकची जबर धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. राजू यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.