संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अनैतिक संबंधाच्या (Immoral Relationship) संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची दुर्दैवी (Man Murder his Wife) घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पतीनेदेखील गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

    पंचवटी : अनैतिक संबंधाच्या (Immoral Relationship) संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची दुर्दैवी (Man Murder his Wife) घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पतीनेदेखील गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल निवृत्ती घोरपडे (वय २९), धनश्री विशाल घोरपडे (वय २६, दोघे रा. तुळजा भवानी निवास, इच्छामणी नगर, आडगाव शिवार) हे दोघे पती-पत्नी आपल्या अडीच वर्षांचा मुलगा आणि विशालची आई यांच्यासोबत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून विशाल याला धनश्री हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने या दोघा पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ही भांडणे वाढली होती. मंगळवार (दि. १२) रात्री अकरा साडेअकरा वाजेच्या सुमारास या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्याने विशालच्या आईने आपल्या अडीच वर्षांच्या नातवाला घेऊन बाहेर असलेल्या महादेव मंदिरात जाऊन झोपली होती.

    बुधवार (दि. १३) रोजी सकाळी उठून विशालची आई घरी आली असता तिला मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर सून धनश्री ही रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये पडलेली दिसून आली. घाबरलेल्या आईने आडगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.