प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कल्याण पश्चिम येथील एस एम फाईव्ह या थिएटरमध्ये पठाण चित्रपट सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० तारखेला रात्रीच्या सुमारास नदीम हूनेरकर आपल्या पत्नीसोबत पठाण चित्रपट बघायला गेले होते.

    कल्याण: पठाण (Pathaan) सिनेमा बघायला गेलेल्या एका कुटुंबातील महिलेची एकाने छेड काढली. त्यानंतर त्या महिलेच्या पतीने जाब विचारला असता महिलेचा पती व त्याच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली. कल्याण (Kalyan) एस एम फाईव्ह थिएटरमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात (Mahatma Phule Police Station) मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करत पुढील तपास सुरू आहे.

    कल्याण पश्चिम येथील एस एम फाईव्ह या थिएटरमध्ये पठाण चित्रपट सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० तारखेला रात्रीच्या सुमारास नदीम हूनेरकर आपल्या पत्नीसोबत पठाण चित्रपट बघायला गेले होते. तिकीट काढून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रवेश करताना एकाने त्यांच्या पत्नीकडे बघून ‘क्या चायना डुबलीकेट माल लाया है’ अशी कमेंट केली. नदीम याने माझ्या पत्नीची छेड का काढतो असे म्हणत त्या माणसाला जाब विचारला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर नदीम यांना मारहाण करण्यात आली. नंतर पती-पत्नी आणि नदीमचा भाऊ थिएटरमधून बाहेर निघत असताना गेटवरच काही तरुण त्यांची वाट बघत होते. ते तिघे बाहेर पडताच या तरुणांनी नदीम त्यांची पत्नी व नदीम यांच्या भावाला लोखंडी रॉडने बेदम मारण करण्यास सुरुवात केली. या महाराणीत नदीम यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी प्रभाकर म्हात्रे, दुर्वेश म्हात्रे आणि प्रसाद म्हात्रे यांच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.