Management orders to go on unpaid leave for both those who have not been vaccinated; Symbiosis staff run to high court

कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विनावेतन रजेवर जाण्याचे इमेल सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने धाडले आहेत. याविरोधात कर्मचार्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले(Management orders to go on unpaid leave for both those who have not been vaccinated; Symbiosis staff run to high court).

    मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विनावेतन रजेवर जाण्याचे इमेल सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने धाडले आहेत. याविरोधात कर्मचार्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले(Management orders to go on unpaid leave for both those who have not been vaccinated; Symbiosis staff run to high court).

    पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठात सुपरवाइझर पदावर काम करणारे सुब्रता मझुमदार यांना विद्यापीठाच्या प्रधान संचालक विद्या येरवडेकर यांनी कोविड प्रतिबंदात्मक लस घेत नाही तोपर्यंत विनावेतन रजेवर जाण्याचा इमेल २०२१ रोजी पाठवला होता. मात्र, वैद्यकीय अडचणींमुळे लस घेवू शकत नसल्याची माहिती त्यांनी संचालकांना दिली. जानेवारी २०११ मध्ये महिन्यात अशाच आशयाचा इमेल व्यवस्थापणाकडून मझुमदार यांच्यासह इतर कर्मचार्‍यांना पाठविण्यात झाला.

    याविरोधात मझुमदार यांनी सिम्बॉयसिस व्यवस्थापन आणि प्रधान संचालक विद्या येरवडेकर यांच्या विरोधात अ‍ॅड. कृष्णा मोरे, अ‍ॅड अनिमेश जाधव आणि अ‍ॅड. वसंत टक्के यांच्यामार्फत याचिका दाखल केली या याचिकेवर न्या. ए. के. मेनन आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकेची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला प्रतिज्ञापत्रार भूमिका स्पष्ट कऱण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी १३ मे रोजी निश्चित केली.