‘लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ ; खराडीतील सभेत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील कडाडले

मराठा समाजाला आरक्षण आधीच मिळाले असते तर ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. ९५ टक्के पडले तरी, मराठ्याचं लेकरु घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळालं असतं तर, मराठा जात जगात एक नंबरवर राहिली असती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळं आता सरकारला सुट्टी नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी िदला.

    पुणे : मराठा समाजाला आरक्षण आधीच मिळाले असते तर ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. ९५ टक्के पडले तरी, मराठ्याचं लेकरु घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळालं असतं तर, मराठा जात जगात एक नंबरवर राहिली असती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळं आता सरकारला सुट्टी नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी िदला.

    पुण्यातील खराडी येथे मराठा आरक्षणाबाबत अायाेजीत सभेत ते बाेलत हाेते. जरांगे-पाटील म्हणाले, माझ्या मराठा समाजासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्याच्यातली माणुसकी जिवंत व्हायची. त्यानं कधीच कोणाची जात शोधली नाही. जे आपल्या हातात आणि पदरात आहे ते मोठ्या मनानं देण्याचं काम माझ्या बापजाद्यांनी केलं. प्रत्येकाच्या सुखादुखात माझा बापजादा धावून गेला. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे हे त्यांनी बघितलं. स्वतःच्या लेकराला एक वेळाचं दिलं नाही पण दुसऱ्याचं लेकरु उघड्यावर पडू दिलं नाही. ओबीसी आरक्षणाच्या एकाही टक्क्यालाही धक्का लागला नाही पाहिजे ही मराठा समाजाची आजही भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे. मंडल आयोगानं ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिलं, म्हणजे ओबीसी २८ टक्के आहेत. हे आम्ही नाही ठरवलं ते मंडल आयोगानं ठरवलं. सन १९९४ मध्ये हे आरक्षण ३० टक्के झालं. म्हणजे ओबीसी ६० टक्के झालं. यात बेकायदा पद्धतीनं पोटजाती घुसवण्यात आल्या मराठ्यांनी कधीच जातीयवाद नाही केला असेही ते यावेळी म्हणाले.

    -असं कोणतं पाप आम्ही केलं?
    माझ्या मराठा समाजासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्याच्यातली माणुसकी जिवंत व्हायची. त्यानं कधीच कोणाची जात शोधली नाही. जे आपल्या हातात आणि पदरात आहे ते मोठ्या मनानं देण्याचं काम माझ्या बापजाद्यांनी केलं. प्रत्येकाच्या सुखादुखात माझा बापजादा धावून गेला. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे हे त्यांनी बघितलं. स्वतःच्या लेकराला एक वेळाचं दिलं नाही पण दुसऱ्याचं लेकरु उघड्यावर पडू दिलं नाही. जात ही माझ्या बापजाद्या मराठ्यांना कधी शिवली नाही.माझा मराठा समाज सगळ्यांच्या कल्याणसाठी उभा राहिला. सगळ्यांच्या पाठीवरून हात फिरवला. कोणत्याही समाजाचा माणूस आला तरी माणुसकी जागी व्हायची. प्रत्येकाच्या सुखदुःखात माझा बापजादा मराठा धावून गेला. त्यांनी लोकांचा द्वेष केला नाही. दुसऱ्याला आधार दिला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अनेक नेत्यांना मोठं केले पण ते आता मराठ्यांच्या मदतीला येत नाहीत. असं कोणतं पाप आम्ही केलं? असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

    -ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनीच घात केला
    आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली ते आम्हाला वेळ आल्यावर उभा राहतील असं वाटत होतं. सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम मराठ्यांनी केलं, त्यांच्यात जात पहिली नाही. पण ज्यांना मोठं केलं ते आज आमच्या मदतीला येत नाहीत. आमची अशी काय चूक झाली की, आम्ही मोठे केलेले लोक मराठ्यांकडे ढुंकून पाहत नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनीच घात केला. ही संघर्षाची वेळ आहे आता तरी जागे व्हा. सगळ्या समित्या झाल्या त्यांनी पुरावे शोधले. मात्र, ते बुडाखाली पुरावे लपून ठेवले आणि म्हणाले पुरावे नाहीत. विदर्भातील मराठ्यांचा व्यवसाय शेती, माळी बांधवांचा व्यवसाय शेती, मग मराठ्यांना कुणबी आरक्षण का नाही? समितीने काम सुरु केले आणि मराठ्यांचे पुरावे सापडू लागले. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २९ लाख नोंदी सापडल्या, जर आम्ही आरक्षणात होतो तर ७५ वर्षे आमचं वाटोळं कोणी केलं? आम्हाला आरक्षण कोणी दिलं नाही त्याच नाव आता आम्हाला हवं अशा शब्दात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

    -मी तुमच्या रक्तामासाचा आहे बदलणार नाही.
    मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत मराठा आरक्षण कशाप्रकारे गरजेचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आरक्षणासाठी आमच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले आहेत. हे आता सहन होणारे नाही. सरकारला सुट्टी नाही. असे त्यांनी ठणकावून सांगितले. मराठ्यांचाच विजय होईल थोडा दम धरा. आंदोलन शांततेत करायचे आहेत. कुठलीही जाळपोळ करायची नाही. मी तुमच्या रक्तामासाचा आहे तुमच्यासाठी लढतोय कधीच बदलणार नाही असेही ते म्हणाले

    -ओबीसी आरक्षणाला धक्का नको
    ओबीसी आरक्षणाच्या एकाही टक्क्यालाही धक्का लागला नाही पाहिजे ही मराठा समाजाची आजही भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाज कुणबी असलेले दाखले संत तुकारामांनी दिले आहेत. आपले दोन अंग आहेत एक युद्ध प्रसंगी लढाई करण्याचे, दुसरे शांततेच्या काळात शेती करून नागरिकांना अन्न धान्य पुरवण्याचे. ज्यां मराठ्यांना वाटते आम्हाला कुणबी आरक्षण नको त्यांनी घेऊ नका. आरक्षण विरोद्याला खपवून घेतले जाणार नाही मग तो मराठा असो की इतर कोणीही.

    -कोणीही आत्महत्त्या करू नका
    आपला विजय होणार आहे. मात्र तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. मी तुमच्यासाठी आरक्षण घेत आहे मग तुम्हीच नसलात तर आरक्षण कोणाला द्यायचे. मला तुमची गरज आहे. आत्महत्या केल्यावर घरावर आभाळ कोसळते. थोडा दम धरा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    -भुजबळांवर टीका
    भुजबळ साहेब तुम्हाला आमचा वैयक्तिक विरोध नव्हता. आम्ही तुम्हाला मानत होतो, तुमचा आणि आमचा वैचारिक विरोध होता. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून विरोध होता. पण आता तुम्हाला व्यक्ती म्हणून पण आमचा विरोध. तुम्ही घटनेच्या पदावर बसून सर्व सीमा ओलांडल्या. ३५-४० वर्ष झाले आपण सत्तेत आहात, तरीदेखील मराठा समाजाच्या विरोधात एवढी विषारी भूमिका का? जातीजातीत दंगली होतील, असे वक्तव्य करायला लागलेत. पण आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. गाव खेड्यातील ओबीसी बांधव म्हणतोय जर नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिल पाहिजे. आपल्या नेत्याने विरोध केला नाही पाहिजे. यांच्या राजकीय स्वर्थासाठी तेढ निर्माण केली आहे. मराठा बांधवांना माझी विनंती आहे, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. पण तुम्ही यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपल्याला राग येईल, असं हे बोलत आहेत. पण आता विजयची वेळ जवळ आहे. तुम्ही शांत रहा आणि सलोखा जपा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला.