मंडलिक, मुश्रीफ सर्कशीतील नकली वाघ ; शिवसना ठाकरे गटाचे संजय पवार यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे लंडनमधून आणतो. असे सरकारकडून सांगितले गेले आहे. ही शिवरायांनी स्पर्श केलेली खरी वाघ नखे आहेत ? का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला होता.

    कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे लंडनमधून आणतो. असे सरकारकडून सांगितले गेले आहे. ही शिवरायांनी स्पर्श केलेली खरी वाघ नखे आहेत ? का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला होता. यावर हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी टीका केली आहे, पण हे दोघेही सर्कशीतील नकली वाघ आहेत. त्यांना दात आणि नखे ही नाहीत, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. सातारा छत्रपतीच्या सीलेखान्यात अफजलखानाच्या वधाच्या वेळी वापरण्यात आलेली वाघ नखे शस्त्रे१९१९ पर्यंत याबाबतची स्पष्टता दिसून येते. या शस्त्रांची नोंदी सातारा येथे आहे.ही वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केलेली नाहीत हे स्पष्ट आहे. याबाबत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. मिंधे सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वाघ नखे हा विषय आता पुढे आणला आहे.

    निवडणुकीच्या तोंडावर सुचले
    निव्वळ निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे यांना सुचले आहे मात्र; येत्या निवडणुकीत ही वाघ नखे यांचा योग्य ते कार्यक्रम करतील, असेही संजय पवार म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारे संजय मंडलिक लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी मातोश्रीवर अनेक वेळा हेलपाटे मारले त्याचा मी सर्वस्वी साक्षीदार आहे. त्यामुळे मंडलिक यांनी शिवसेना व आदित्य ठाकरे यांच्यावर बोलत असताना जबाबदारीने बोलावे असा इशारा त्यांनी दिला.

     किल्ल्यांसाठी किती निधी आणला
    खासदार संजय मंडलिक, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांसाठी किती निधी आणून दिला हे त्यांनी प्रथमता स्पष्ट करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किमान त्यांनी वाचावा आणि मग यावर बोलावे. इतिहास संशोधक सावंत यांच्या शोध भवानी तलवारीचा या पुस्तकातील वाघनखाचा अभ्यास करावा त्यानंतरच आदिती ठाकरे यांच्यावर बोलावे. हे पुस्तक आम्ही मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत, असे पवार, यांनी सांगितले.