दर्ग्यावर दर्शनासाठी चाललेल्या महिलेचा विनयभंग करत मंगळसूत्र हिसकावले, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याणच्या होम बाबा टेकडीवरील दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने नराधमने तिचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला होता.

    कल्याण : कल्याण होम बाबा टेकडी परिसरात दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिचे मंगळ सूत्र हिसकावून पसार झालेल्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. अमीर शेख असं या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे .दोन महिने तो पोलिसांना चकवा देत होता. अमीर बदलापूर येथे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सापळा रचत अमीरला अटक करण्यात आली आहे.

    कल्याणच्या होम बाबा टेकडीवरील दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. महिलेने आरडाओरड करत प्रतिकार केल्याने नराधमने तिचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला होता. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला होता. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, टिळक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते, पोलीस अधिकारी अजिमुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलिसांच्या पथकाने या आरोपीचा शोध सुरू केला.

    आरोपीची ओळख पटवली, आरोपी अमीर शेखच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. तब्बल दोन महिने आरोपी आमिर शेख हा पोलिसांना चकवा देत होता. अमीर हा काही दिवस अजमेरला लपुन बसला होता. टिळक नगर पोलिसांचे पथक अजेमरला गेले मात्र तेथून अमीर निसटला त्यांतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर अमीर बदलापूर येथे येणार असल्याची माहिती टिळक नगर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे टिळक नगर पोलिसांच्या पथकाने बदलापूर परिसरात सापळा रचत आमिरला अटक केली आहे.