माणगांवमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन, मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तासाहून अधिक वेळ केला बंद

नोज जरांगे पाटील यांच्या उपोषणातून सुरू झालेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी आता गाव पाड्यात देखील पोहचली आहे.

    माणगांव : माणगांव शहरामध्ये आज गुरुवार दिनांक २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणातून सुरू झालेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी आता गाव पाड्यात देखील पोहचली आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन आणि लवकर आरक्षण मिळण्यासाठी आज रास्ता रोको करण्यात आला होता. माणगांवचे प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांना आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिले.

    या रास्ता रोको व आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला रायगड जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा असल्याचे लिखीत निवेदन दिले. तब्बल ३० मिनिटेहून अधिक वेळ रस्त्यावर ठिय्या मांडून मराठा आंदोलक बसले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.