कचरा करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर नगर पंचायतीचा बडगा, स्वखर्चाने कचरा उचलण्यास पाडले भाग

माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना ही तक्रार कळताच त्यांनी तात्काळ या उर्मट फळविक्रेत्याचा शोध घेऊन त्याला कार्यालयात बोलावून घेतले.

    माणगांव : माणगांव नगरपंचायत हद्दीत एका फळविक्रेत्याने बेशिस्तपणे टाकलेला कचरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी त्याला शिस्तीचा बडगा दाखवताच अखेर त्या विक्रेत्याला जेसिबी यंत्राने सदर कचरा उचलावा लागला. सविस्तर घडला प्रकार असा की, एका फळ विक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात कचरा टाकला. एका सुजाण नागरिकाने त्याच्या निदर्शनास ही बाब येताच त्या फळविक्रेत्याला विचारणा केली असता उर्मटपणे उलट उत्तर देत या महाशयांनी येथे कचरा कुठे टाकू नये असा फलक लावलेला नाही म्हणून मी कचरा टाकणार! असे उद्धट उत्तर दिले आणि कचरा टाकून तिथून निघून गेला. घडला प्रकार या सुजाण नागरिकाने नगरपंचायत कार्यालयात सांगून कचरा टाकणाऱ्या गाडीचा फोटो दाखविला.

    माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना ही तक्रार कळताच त्यांनी तात्काळ या उर्मट फळविक्रेत्याचा शोध घेऊन त्याला कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी कार्यालयात उपस्थित माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, स्वच्छता व आरोग्य सभापती दिनेश रातवडकर, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड नगरसेवक व नगरसेविका यांनी फळविक्रेत्यास जाब विचारला असता त्याने कचरा टाकल्याचे कबूल केले आणि कारवाई केली जाईल हे लक्षात आल्यावर मी टाकलेला कचरा उचलून घेतो असे सांगत माफी मागितली. बुधवार दि.११ ऑक्टोबरला JCB व ट्रक्टरच्या साहाय्याने कचरा उचलून घेतला.

    माणगांवमध्ये कचरा होतो ते अशा बेशिस्त नागरीक आणि व्यावसायिकांमूळे मोर्बा रोडचा हा परिसर म्हणजे काही लोकांना कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाणचं असल्या सारखे जाऊन तिथे कचरा टाकतात. अंतर्गत शहराचा विचार केला तर या काही बेशिस्त माणगांवकरांनी तर कालव्याच कचरा टाकून गटारच केल आहे. शहरात ठिकठिकाणी असे महानग दिसून येतात. पण स्वतःच घाण करत बाजूला होऊन साळसूदपणाचा आव आणत इथे नुसता कचरा असतो अशी उलटी बोंब ठोकायला मोकळी होतात. कचरा घंटा गाडीत टाकायला नको? कारणं द्यायची मोकळ व्हायचं.. एवढंच काय ते सुरू असत. मग चुकी तरी नक्की कोणाची?

    दुसरीकडे पाहिलं तर स्वच्छता मोहिमेसाठी नगरपंचायत आग्रही आहे. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आपले शहर स्व. अशोकदादा साबळे यांच्या स्वप्नातील स्वच्छ माणगांव सुंदर माणगांव शहर असावे असे नेहमीच बोलताना दिसतात. जिल्हाधिकारी रायगड यांचे संकल्पनेतून साकारकेल्या सुलभीकरण व सुशोभिकरण मोहिमेचे ५ टप्पे पार पडले. आपल्या परीने नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे ही मोहीम यशस्वी करण्या-साठी प्रयत्नशील असलेले पाहायला मिळाले आहेत. रात्रीचे शहर सफाई अजुन पर्यंत कधी झाली नव्हती पण या पाच सहा महिन्यांपासून रात्रीची बाजारपेठेतील रस्त्यांवर देखील कचरा काढला जात आहे.

    फळविक्रेत्यावर केलेल्या कारवाई नंतर बाजारपेठेत, बाबांनो ‘सावधान..! जो कचरा टाकताना घावला, त्याला चांगलाच जेसीबी घेऊन कामाला लावला’ अशी कुजबूज सुरू आहे. या कारवाईमुळे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार आणि मुख्याधिकारी संतोष माळी शहर स्वच्छतेसाठी आग्रही असून बंड केला तर चांगलाच दंड बसेल हे मात्र आता या कृतीतून निश्चित समजले जात आहे.