औरंगाबाद बाजार समितीमध्ये आंबा महोत्सव आजपासून सुरुवात!

बाजारपेठेमध्ये आजही मराठवाड्यातील गावरान आंब्यांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे, गावरान आंब्यासाठी आजी कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याची गरज नसल्याचे मत फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले. 

    औरंगाबाद : शहरातील बाजार समिती परिसरात आंबा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली असून सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे पांडुरंग तांगडे विजय शिरसाठ यांनी केले होते. या आंबा महोत्सवाला मध्ये महाराष्ट्रातील विविध आंब्यांचा इतर राज्यातील आंबे विक्रेत्यांनीही सहभाग घेतला असून जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येत असतात, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. यावेळी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, औरंगाबाद बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ आपण उपलब्ध करून दिली असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

    बाजारपेठेमध्ये आजही मराठवाड्यातील गावरान आंब्यांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे, गावरान आंब्यासाठी आजी कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याची गरज नसल्याचे मत फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले.  या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ औरंगाबाद शहरात उपलब्ध करून देणार असून या दृष्टिकोनातून काम सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे. सदरील आंबा महोत्सव आज रोजी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे.