मतदानापूर्वीच डॉ. भारती पवार यांच्या कार्यालयाबाहेर महिलांचा गोंधळ; आंबे फेकले अन्…

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारासाठी कमी दिवस शिल्लक असताना महायुती व महाआघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे.

    नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारासाठी कमी दिवस शिल्लक असताना महायुती व महाआघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची चढाओढ लागली आहे. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या कळवण येथील प्रचार कार्यालयावर दोन्ही महिलांनी आंबे फेकून अनोखा निषेध नोंदवला आहे.

    महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष डॉ. भारती पवारांवर असून, त्यामुळेच गावोगावी त्यांना जाब विचारून त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखले जात आहे.

    मतदारांची समजूत काढताना पवार समर्थकांना तसेच महायुतीच्या नेत्यांना अवघड जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर कांदा फेकीचे सावट असतानाच दोन दिवसांपूर्वी कळवण शहरात डॉ. भारती पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर उभ्या असलेल्या दोन्ही महिलांनी रस्त्यावर आंबे विक्री करणाऱ्यांकडून आंबे खरेदी केले व थेट पवार यांच्या कार्यालयावर फेकले आहेत.

    दरम्यान, सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.