आज तुम्ही उध्दवजींवर अशी वेळ आणली की कंटाळून त्यांनी वर्षा बंगला सोडला – मनीषा कायंदे

अजुनही वेळ गेलेली नाही आहे, अजुनही थांबू शकतात. आता या चाळीस लोकांना काय दु:ख आहे. काहींना दु:ख असेल तर त्यांनी वडील म्हणून उध्दव ठाकरे साहेबांसोबत बोलायला पाहिजे. असेही त्या म्हणाल्या.

    जालना : हे सगळे गुवाहाटीला बसून चाललं आहेत. त्यांनी मुंबई मध्ये यावं. मुबंईमध्ये उपाध्यक्षांना भेटावे. जे नियम आहेत ते पाळावे. तुम्ही तिथे बसून बंड कशासाठी करत आहात ? का घाबरत आहात ? तुम्हाला तिथे जाण्याची गरज देखील नव्हती. अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्या मनिषा कांयदे यांनी बंडखोर आमदारांना सुनावले.

    अजुनही वेळ गेलेली नाही आहे, अजुनही थांबू शकतात. आता या चाळीस लोकांना काय दु:ख आहे. काहींना दु:ख असेल तर त्यांनी वडील म्हणून उध्दव ठाकरे साहेबांसोबत बोलायला पाहिजे. तसेच घरात कुरबुरी होत असतात. कोणत्या घरात होत नाही. आपल्या घरात होत नाही का ? म्हणुन आपल्या बापाला बाहेर काढायला निघत नाही. आज तुम्ही उध्दवजींवर अशी वेळ आणली की त्यांनी कंटाळून त्यांनी वर्षा बंगला सोडला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. असेही त्या म्हणाल्या.