
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आता साखळी उपोषण सुरु आहे. परंतु या उपोषणादरम्यान त्यांच्या अवयवांवर काही परिणाम झाला आहे का? हे तपासण्यासाठी त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आता साखळी उपोषण सुरु आहे. परंतु या उपोषणादरम्यान त्यांच्या अवयवांवर काही परिणाम झाला आहे का? हे तपासण्यासाठी त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने उभारण्यात आले आहे. यात जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे ना घेण्यावर जरांगे पाटील ठाम होते. सतरा दिवस मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले. १७ व्या दिवशी उपोषण मागे घेतले. परंतु गावात साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे.
शरीराच्या होणार सर्व चाचण्या
अंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असून, या उपोषणा दरम्यान शरीरावरील अवयवावर झालेल्या परिणामांची तपासणी करण्यासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चाचण्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.