मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना अध्यादेश सुपूर्द

    नवी मुंबई : नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. अखेर मराठा समाजाच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. राज्य सरकारकडून आरक्षणासंदर्भातील मागण्यांचा अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातानं ज्यूस घेत, मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला.

    काय म्हणाले मनोज जरांगे ?

    मराठा आंदोलनाचा संघर्ष हा मोठा आहे. हे मराठ्यांचे यश आहे. हा मराठ्यांचा विजय आहे. या यशासाठी मराठा समाजाने खूप यातना सहन केल्या. काय माकडे खूप काही म्हणत होते. सगे सोयरे शब्द करता येणार नाही. काही जणांनी माझे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. ट्रॅपचा प्रयत्न झाला होता. खूप त्रास सहन केला. आरक्षण आंदोलनासाठी अनेक जण कारागृहात गेले. आंदोलनासाठी अनेकांचे बलिदान झाले. अखेर यश मिळाले. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करत आहे.

    मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं

    सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेली सर्व कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांनी तपासून पहिली. त्यानंतर उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे, ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन त्यांचे उपोषण सोडले.