मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळं सलाईनवर, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडेंनी घेतली भेट

मी एकटा मेलो तरी चालेल पण पाच कोटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत.

    जालना : मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. (Maratha Resetvation) आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत.  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे जालन्यात मागील ९ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून, शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळं त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. असं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळं जालना, औरंगाबादच्या परिसरातून मराठा कार्यकर्ते आंदोलनस्थळी येताहेत. (Manoj Jarang’s health deteriorated; On saline due to lack of water in the body, Superintendent of Police Shailesh Balkawade visited)

    महासंचालक व अधीक्षकांनी घेतली भेट

    दरम्यान, मनोज जरांगे यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. परंतू मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान, आज आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी  उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काल सरकारचे शिष्टमंडळ दुसऱ्यांदा भेटायला गेले होते. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही.

    मी मेलो तरी चालेल…

    मनोज जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पण सरकारने एक महिन्याची मुदत मागितली आहे. एक वाक्याचा अध्यादेश काढा, आम्हाला सुप्रीम कोर्टाचे आरक्षण नको. जातप्रमाणपत्र हवे आहे. तसेच मी शेवटपर्यंत लढत राहणार, मी एकटा मेलो तरी चालेल पण पाच कोटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जीआरमध्ये दुरुस्ती करून आणतो, असं आश्वासन अर्जुन खोतकर यांनी दिलं होतं. पण तो दुरुस्त केलेला जीआर घेऊन ते अद्यापही आलेले नाहीत.

    जरांगे सलाईनवर…

    जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. दरम्यान खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आज सलाईन लावलंय. शरीरातील पाणी पातळी कमी होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली. तसच तेथील सुरक्षेचा आढावा देखील घेतला.