Maratha Reservation
Manoj Jarange's counter attack on Chhagan Bhujbal

मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत असून, पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे.

  सोलापूर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. या दरम्यान 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या (15 नोव्हेंबर) सोलापूरच्याकरमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे. यासाठी 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे.

  सभेसाठी जय्यत तयारी
  सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वांगी नंबर 1 या ठिकाणी मनोज जरांगे पाटिल यांची उद्या तोफ धडाडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.

  जरांगे कोणावर निशाणा साधणार?
  मनोज जरांगे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभेत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर मागील काही दिवसात मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली जात आहे. विशेष करून मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजयी वेडट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे. त्यातच, भोकरदनमध्ये गाव बंदीचे बॅनर फाडल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जरांगे नाव न घेता टीका करत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे आता कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा (तिसरा टप्पा)
  15 नोव्हेंबर 2023 (बुधवार)

  सकाळी 11 वाजता : अंतरवाली सराटी
  दुपारी 4.30 वाजता : वाशी
  रात्री 7.30 वाजता : परांडा

  16 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)

  सकाळी 11 वाजता : करमाळा
  दुपारी 5 वाजता : दौंड

  17 नोव्हेंबर 2023 (शुक्रवार)

  सकाळी 10 वाजता : मायणी
  दुपारी 2 वाजता : सांगली
  दुपारी 5 वाजता : कोल्हापूर
  रात्री 8 वाजता : इस्लामपूर

  18 नोव्हेंबर 2023 (शनिवार)

  सकाळी 10 वाजता : कराड
  दुपारी 1 वाजता : सातारा
  दुपारी 4 वाजता : मेढा
  रात्री 10 वाजता : वाई

  19 नोव्हेंबर 2023 (रविवार)

  सकाळी 9 ते 11 : पाचाड ते रायगड
  रात्री 7 वाजता : रायगड-मुळशी-आळंदी

  20 नोव्हेंबर 2023 (सोमवार)

  सकाळी 9 वाजता: आळंदी
  सकाळी 11 वाजता : तुळापूर
  दुपारी 3 वाजता : पुणे
  सायं. 6 वाजता : खालापूर

  21 नोव्हेंबर 2023 (मंगळवार)

  सकाळी 10 वाजता: कल्याण
  दुपारी 3 वाजता : ठाणे
  रात्री 8 वाजता : पालघर

  22 नोव्हेंबर 2023 (बुधवार)

  सकाळी 11 वाजता : त्रंबकेश्वर
  दुपारी 3 वाजता : विश्रांतं
  सायं. 6 वाजता : संगमनेर

  23 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)

  सकाळी 10 वाजता : श्रीरामपूर
  दुपारी 1 वाजता : नेवासा
  दुपारी 5 वाजता : शेवगाव
  सायं. 7 वाजता : धोंडराई