
बारामती/पुणे : जालना मराठा क्रांती मोर्चाला आलेल्या आक्रमक स्वरूपानंतर मनोज जरांगे पाटील सर्व महाराष्ट्राला कळाले. आता मनोज जरांगे पाटलांचा पुणे दौरा सुरू आहे. आज त्यांची शेवटची सभा बारामती येथे सुरू आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांना संबोधित करताना, आंदोलन करताना कोणतेही अनुचित पाऊल न उचलण्यास सांगितले. तसेच, मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी मी येथे माझ्या जातीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माझ्या मराठा समाजाला मी मायबाप समजतो, मराठ्यांशी गद्दारी करायची माझी पैदाईश नाही. त्यामुळे मी त्यांच्यासाठी येथे आलो आहे.
माझ्या कानात बोलायचे नाही सर्व जनतेसमोर बोलायचे
माझ्या समाजावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी येथे आलोय, हे पवित्र मराठ्यांचे व्यासपीठ आहे, जे काही बोलायचे ते येथेच बोला. बाजूला घेऊन मला काही बोलाचये नाही. माझ्याजवळ आख्खं मंत्रिमंडळ आले होते. परंतु, मी एक इंचसुद्धा बाजूला जाणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी जनतेला दिला. माझे सर्व मंत्र्यांना सांगणे होते जे काही बोलायचे माझ्या जनतेसमोर बोलायचे, मी येथेच माझा निर्णय सांगेन. हे पवित्र मराठ्यांचे व्यासपीठ आहे, जे काय बोलायचे आहे ते सर्वांसमोर आहे.
मराठ्यांच्या लेकरांनी आत्महत्या करायची नाही
यावेळी मनोज जरांगे यांनी कायदा सोडून बोलणार नाही, परंतु हक्काचे आरक्षण घेतल्या वाचून राहणार नाही, असा सरकारला इशारा दिला. मी कोणाला घाबरत नाही, माझ्या जातीवर पिढ्यान पिढ्या अन्याय झाला आहे. आता हा अन्याय दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे.
माझ्याकडून गद्दारी होणार नाही
मला जर तुमच्याशी गद्दारी करायची होते तेव्हा मला लय सोपी होती. परंतु, मराठ्यांशी गद्दारी करायची पैदाईश माझी नाही, माझ्या मराठा समाजाला मी मायबाप समजले आहे. मला रायगडावर आणि शिवनेरी चढायचे कसे माहिती आहे. रायगडावर आणि शिवनेरीवर नॉनस्टॉप चढेल त्याला कोणताच रोग होणार नाही.
मरेपर्यंत मराठ्यांशी गद्दारी करणार नाही, आमच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे. एकही पक्ष असा नाही. ज्याला मराठ्यांनी मोठे केले नाही. कधीही मराठ्यांनी जात पाहिली नाही.
आम्ही तुम्हाला आमची म्हणून मदत केली, परंतु तुम्ही आम्हाला आपले मानत नव्हता, हे स्पष्ट झाले. आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला खूप मोठे केले आणि आता लेकरांची वेळ आली तुम्ही आता उलट बोलत आहात.
आपल्याच विरोधात आपले लोकं उभी केली जाताहेत. आता सुटी नाही. एका प्रश्नाचे उत्तर द्या, तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली कोणत्या आधारावर गेली. कायद्याने आम्हाला का आरक्षण दिले जात नाही, याचे उत्तर देता येत नाही.