जालन्यात मुख्यमंत्री न गेल्यानं मनोज जरांगे-पाटील नाराज; आज 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार

आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर जरांगे पाटील आज सकाळी 11.30 वाजता फायनल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या या उपोषणाचा आज 17 वा दिवस असून, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

    जालना – जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) साखळी उपोषण करत आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. या उपोषणस्थळी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संभाजीराजे, उदयनराजे यांनी यावं आणि आपल्याला आरक्षणासंदर्भात आश्वासन द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र काल दिवसभर मुख्यमंत्री जालन्यात गेले नाहीत, त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे नाराज झाले असून, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत रात्री उशिरा रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी चर्चा केली. मात्र आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर जरांगे पाटील आज सकाळी 11.30 वाजता फायनल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या या उपोषणाचा आज 17 वा दिवस असून, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. (Manoj Jarange-Patil upset over Chief Minister not going to Jalna; A press conference will be held today at 11.30 to decide the direction of the movement)

    काय म्हणाले जरांगे-पाटील?

    दरम्यान, मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ दाखले देण्याच्या मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकारने एक महिन्याची मुदत मागितली ती आम्ही दिली. मी आता आमरण उपोषण आणि नंतर साखळी उपोषण करणार आहे. आम्ही सरकारला वेठीस धरले नाही. सरकारने वेठीस धरले. ते आले आणि नाही आले तरी आम्ही नाराज होणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. पण मुख्यमंत्री जालन्यात आले नाहीत, त्यामुळं मराठा आंदोलक नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं आज सकाळी साडेअकरा वाजता निर्णय जाहीर करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    चर्चा समाधानकारक – दानवे

    दुसरीकडे बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन हे जरांगे पाटलांसह त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चा समाधानकारक झाली. सरकार अरक्षणाबाबत गंभीर आहे. असे रावसाहेब दानवे म्हणाले. सरकारशी चर्चा करु त्यानंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं दानवे म्हणाले. तर “उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही. हे आरक्षणाप्रमाणेच झालं, देतो म्हणतात पण देत नाहीत असं जरांगे-पाटील म्हणाले. सरकारच्या दोन अटी होत्या. एक महिना वेळ द्या आणि आमरण उपोषण सोडा असं सांगण्यात आलं”, अशी व्यथा जरांगे पाटील यांनी मांडली.