आरक्षणविरोधात बोलल्यास टप्प्यात घेणार! महाबळेश्वरमधील सभेत मनाेज जरांगे-पाटील यांचा इशारा

मराठ्यांना विजयाचा सुवर्णक्षण बघायचा आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होऊ नये. तोंडाला आलेला अन्नाचा घास आरक्षणाचा त्यांच्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी संयमाने घेऊन सहन केलं. मराठ्यांच्या आरक्षणविरोधात कुणी बोललं तर मी टप्प्यात घेतलच म्हणून समजा. मला फक्त मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू बघायचा आहे, असे मत मराठा अारक्षणाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.

  महाबळेश्वर :  मराठ्यांना विजयाचा सुवर्णक्षण बघायचा आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होऊ नये. तोंडाला आलेला अन्नाचा घास आरक्षणाचा त्यांच्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी संयमाने घेऊन सहन केलं. मराठ्यांच्या आरक्षणविरोधात कुणी बोललं तर मी टप्प्यात घेतलच म्हणून समजा. मला फक्त मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू बघायचा आहे, असे मत मराठा अारक्षणाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले.

  महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने तुफान पुष्पवृष्टी करून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. बालकलाकार साईशा साळवी हिच्या हस्ते जरांगे पाटील यांच्या गळ्यात गुलाबांचा पुष्पहार घालण्यात आला. यावेळी डी. एम. बावळेकर, किसन शिंदे, संजय गायकवाड, संतोष शिंदे बाळकृष्ण साळवी, दिलीप वागदरे, विमल पार्टे, उषा ओंबळे, वनिता जाधव. सी. डी. बावळेकर, महेश गुजर, लीला शिंदे, सुनील बिरामणे  यांच्यासह शेकडो मराठा समाजबांधव डोक्यावर भगवी टोपी, हातामध्ये भगवा ध्वज घेऊन उपस्थित होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणिय होता

  जरांगे पाटील म्हणाले, राज्यात लाखोंनी मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत. याचा अहवाल पारित होऊन २४ डिसेंबरला महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळणार आहे. ७० वर्षांपासून मराठा समाज न्यायाची प्रतीक्षा करत अाहे. आपण अर्धी लढाई जिंकली अाहे. एका नोंदीवरती जवळपास ५०० ते ६०० लोकांना याचा फायदा होणार असून अश्ाा लाखोंनी नोंदी प्रत्येक जिल्ह्यात सापडत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणामुळे शिक्षणापासून लांब राहायचे ठरवलं होतं, त्यांनी नोंदी मिळाल्यापासून पुन्हा प्रवेश घेण्यास सुरुवात केली. हेच आपल्या या आंदोलनाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

  ७० वर्षांपूर्वीच आरक्षण मिळाला असतं तर अाज छोट्या छोट्या पदावर बसले आहेत ते उच्च पदावर बसलेले
  आपल्याला बघायला मिळाले असते. आपला आरक्षणातील टक्का देखील नोकरीतील आरक्षणामुळे कमी झाला असून आपले अधिकारी बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत. आता पुढच्या दोन वर्षात आरक्षणामुळे प्रचंड संख्येने नोकरदार वर्ग अधिकारी म्हणून मराठ्यांचा असणार हे तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनी पाहणार
  आहे, असे जरांगे पाटील यांनी नमुद केले.

  लेकरांच्या भविष्याची राखरांगोळी करू नका
  जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील मराठ्यांचाच िवजय हाेणार अाहे. यात शंका नाही. फक्त कुणी यामध्ये राजकारण आणू नका. मतभेद होऊ देऊ नका. तुमच्या मतभेद पायी माझ्या मराठा सामाजाच्या गोरगरीब लेकरांच्या भविष्याची राखरांगोळी होता कामा नये. कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या संधीचे सोने करा.

   एक इंचही मागे हटणार नाही
  आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण करू नका. १ डिसेंबर पासून शांततेत आंदोलन सुरु करा. एकही तालुक्यात गाव नाही राहील पाहिजे जेथे साखळी उपोषण सुरू झालं नाही. मरण अाले तरी आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा शब्द त्यांनी उपस्थित मराठा समाजबांधवांना दिला.