
पुणे येथील सभेचा कार्यक्रम करुन मनोज जरांगे-पाटील यांचा ताफा बारामती दहिवडी-अकलूज बाजुकडे जात असताना, दौंड तालुक्यात यवत (ता. दौंड) सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा येथे अखिल मराठा समाज एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांचे जिसीबी वरुन पुष्प फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले.
यवत : पुणे येथील सभेचा कार्यक्रम करुन मनोज जरांगे-पाटील यांचा ताफा बारामती दहिवडी-अकलूज बाजुकडे जात असताना, दौंड तालुक्यात यवत (ता. दौंड) सोलापूर महामार्गावरील भुलेश्वर फाटा येथे अखिल मराठा समाज एकवटला होता. मनोज जरांगे पाटील यांचे जिसीबी वरुन पुष्प फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले तसेच फटाक्यांच्या धुम धडाक्यात हलगी वाजवत भुलेश्वर फाटा ते यवत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मराठा समाजातील युवा तरुण व जागरुक नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला.
या वेळी जमलेल्या मराठा समाजाला आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले. मराठा समाजातील युवा तरुणांनी आत्महत्या करु नये. पुन्हा ताकतीने एकत्र या, हा प्रश्न माझ्या स्वार्थाचा नाही. प्रत्येक घरा घरातल्या पोरांचा प्रश्न आहे. आत्ता पोरांचे मुडदे पडु देऊ नका. आरक्षण नसल्याने शिक्षण व नोकरी वाचून सर्व तरुण पोरं बेरोजगार होऊ लागली आहेत. सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. ती पुढच्या पिढीत होऊ देऊ नका. आज पर्यंत झाले ते बस झाले. आत्ता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. आता हा मराठा कुणबी असल्याचा लढा सर्व सामान्य मराठ्यांनी हाती घेतला असल्याने,यामध्ये फुट पाडण्याची ताकद राहिली नाही. मी ही सामान्य माणूस आहे. तुम्हाला दिसत नाही काय ? असा थेट सवाल उपस्थित नागरिकांना करुन युवकांची मने जिंकली.
जनजागृतीचे वादळ वाहू लागले आहे
मराठा कुणबी आरक्षण जनजागृतीचे वादळ मोठ्या झपाट्याने वाहू लागले आहे. मराठा आरक्षणावर युवा तरुणांनी प्रामुख्याने जबाबदारी स्वीकारली आहे. मराठा कुणबी आरक्षण मिळाल्या शिवाय आता माघार नाही,असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दौंड तालुक्यातील यवत पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना दिला आहे. यावेळी अखिल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यवत वरवंड पाटस या ठिकाणी देखिल मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.