i-only-listen-to-sharad-pawar-sanjay-raut-after-ajit-pawar-slams-him

मनोज जरांगे यांना गुंडाळले जाऊ शकत नाही. जरांगे हे गुंडाळले जाणारे व्यक्ती नाही, हा फकीर माणूस आहे, त्यामुळं ते गुंडाळले जाऊ शकत नाहीत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    मुंबई – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. (Maratha Resetvation) जालन्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर पाहयला मिळताहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे जालन्यात मागील १० दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने कुणबी जातप्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आज ११.०० वाजता मनोज जरांगे हे आपला निर्णय स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षणावरुन राज्यातील काही भागात आज बंद तर मोर्चे काढले जाताहेत. दरम्यान, या आरक्षणावरुन राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Manoj Jarange will not be wrapped up; Due to the agitation, the atmosphere in the state has heated up – Sanjay Raut)

    मनोज जरांगे गुंडाळले जाणारे नाहीत

    दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांचे आंदोलन गुंडाळले होते. परंतु मनोज जरांगे यांना गुंडाळले जाऊ शकत नाही. जरांगे हे गुंडाळले जाणारे व्यक्ती नाही, हा फकीर माणूस आहे, त्यामुळं ते गुंडाळले जाऊ शकत नाहीत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    मराठा आंदोलनामुळं राज्यातील वातावरण तापले
    पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावे. एका साध्या व्यक्तीने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज सध्या अस्वस्थ आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याकडे सरकारने लक्ष घालून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.