
सांगली : जालन्याला ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवत मराठा समाजाला आवाहन केले होते. हा नवीन जरांगे म्हणजे नवीन दगडाला शेंदूर लावून देव केला आहे. आता यावर मनोज जरांगे यांनी जोरदार पलटवार करीत जेलमध्ये जाणा्र्यांना कोण शेंदूर लावणार, असा सवाल केला आहे.
त्यांना कळून चुकले आहे मराठ्यांना आता आरक्षण मिळणार आहे. त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय काही नाही. या राज्यात मराठा समाजात ओबीसी आणि मराठा अशा दंगली घडू देणार नाही. आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचे नाही. तुम्ही किती खालच्या दर्जाचे आहेत, हे आमच्या लक्षात आले आहे.
सरकारने आता यांच्यावर लक्ष ठेवावे, आम्हीसुद्धा तुमचा बायोडेटा जमा केला आहे. येथे बीड येथील मोठा समाज आज येथे सभेला उपस्थित होता. आता आम्ही थांबणार नाही. यांना मराठ्यांना आरक्षण मिळूनच द्यायचे नाही. छगन भुजबळांचा बायोडेटा आमच्याकडे असल्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच, आम्हाला त्यांना महत्त्व द्यायचे नाही, असेही सांगितले
आम्हाला यांना महत्त्वच द्यायचे नाहीत. त्यांचे वय झाल्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. आता तुम्हाला देव मानावे असे वाटत असेल. तुम्हाला कोण शेंदूर लावील. तुम्ही 5-5 वर्ष जेलमध्ये बसता, ते म्हणतील तसे होणार नाही. त्यांना आता प्रसिद्धीसाठी काहीसुद्धा करता.
ते किती हुशार आहेत हे कळाले, मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आमचे आरक्षण तुम्हाला द्यावेच लागणार आहे. लोकांचे तुम्ही रक्त पिता, तुम्हाला कोण शेंदूर लावणार. आमच्या नोंदी आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण देणे तुम्हाला भाग आहे. प्रसिद्धीसाठी ते काहीही करायला तयार, ते किती हुशार आहेत ते कळाले, तुम्ही लोकांचे रक्त पिता, 5-5 वर्षे जेलमध्ये जाता तुम्हाला कोण शेंदूर फासणार